BLANTERTOKOSIDEv102
6217215329334371520

पंतप्रधान रोजगार हमी योजना

 *पंतप्रधान रोजगार हमी योजना*

⚡️ गरामीण व शहरी क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार व सुशिक्षित बेरोजगारांना, पारंपारीक कारागीरांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना राबविली जाते. ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या बेरोजगार युवकांचे व पारंपारीक कारागीरांचे स्थलांतर थांबविणे व ग्रामीण भागातील रोजगार वाढीस मदत करणे.

💁‍♂ *योजनेच्या प्रमुख अटी* :

 ▪️ उत्पादन प्रक्रिया असलेल्या प्रकल्पामध्ये प्रकल्प किंमत 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास तसेच सेवा उद्योगामध्ये प्रकल्प किंमत 5 लाख असेल तर किमान शैक्षणिक पात्रता इ. 8 वी पास असणे आवश्यक.
▪️ अर्जदाराचे किमान वय 18 पूर्ण असावे.
▪️ अर्जदाराने केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
▪️ कवळ नवीन उद्योजक,कारागीर, संस्था व बचत गट या योजनेचा लाथ घेण्यास पात्र.

📄 *आवश्यक कागदपत्रे* : 
● अर्ज दोन प्रतींमध्ये
● प्रकल्प अहवाल दोन प्रतींमध्ये
● शैक्षणीक पात्रतेचे दाखले
● अनुभव अथवा प्रशिक्षण असल्यास त्यासंबंधीचा दाखला
● जातीचे प्रमाणपत्र (जिथे आवश्यकता असेल तिथे)
● मशिनरी-हत्यारे-औजारे दरपत्रके
● ग्रामपंचायत ना हरकत दाखला
● लोकसंख्येचा दाखला
● ज्या जागेत व्यवसाय करावयाचा त्या जागेची कागदपत्रे
● जागा भाडयाची असल्यास भाडे करारपत्र
● विद्युत पुरवठा उपलब्ध असल्याचा पुरावा प्लॅन एस्टीमेट
● उद्योजकाचे छायाचीत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड
● 1 लाख रुपयांपेक्षा अधिकचा प्रकल्प असल्यास त्यासाठी प्रकल्प अहवाल.

💸 *लाभाचे स्वरूप असे* : 

▪️ सर्व साधारण संवर्गातील लाभार्थी - 25 टक्के
▪️ राखीव संवर्ग अनुसुचीत जाती - 35 टक्के
▪️ अनुसूचीत जमाती - 35 टक्के
▪️ अल्पसंख्यांक - 35 टक्के
▪️ इतर मागासवर्ग - 35 टक्के
▪️ (महिला- माजी सैनिक-अपंग - 35 टक्के)

🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* : संबंधित जिल्हा कार्यालये.

🖥 *संकेतस्थळ* : www.pmegp.in/www.kvic.org.in  

📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Produk Lainnya