राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना
⚡️ राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्रशासन पुरस्कृत योजना 2007-08 या वर्षापासून मे 2008 च्या परिपत्रकानुसार सुरु केली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सदर योजना राबविली जाते. सदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यासाठी असून सदर योजनेत सर्व प्रवर्गाचा समावेश आहे.
🧐 *योजनेच्या प्रमुख अटी* : शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र आहेत.
📄 *आवश्यक कागदपत्रे* : उत्पन्नाचा दाखला 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतचा.
💰 *लाभाचे स्वरूप असे* : वार्षीक 6 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. इ. 9 वी ते 12 वी पर्यत. इ. 10 वी नंतर व्यवसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतला तर शिष्यवृत्ती बंद होते.
🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* : शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
🖥 *संकेतस्थळ* : http://www.national scholarship portal सन 2015-16 पासुन ऑनलाईन केले आहे.
📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)