BLANTERTOKOSIDEv102
6217215329334371520

सफाई कामगार पुनर्वसन योजना

सफाई कामगार पुनर्वसन योजना

⚡️ राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, या महामंडळाची स्थापना केली असून, या योजनेत 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य केले जाते. हे अर्थसहाय्य सफाई कामगारव त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाकडून केले जात असून जिल्ह्याच्या ठिकाणी ही योजना महात्मा फुले मागासवर्गविकास महामंडळातर्फे राबविली जाते.

🧐 *योजनेच्या प्रमुख अटी* : 

• किमान शैक्षणिक पात्रता आवश्यकता नाही.
• वयोमर्यादा (वर्षे) 18 ते 45
• लिंग पुरूष / महिला
• कार्यक्षेत्र ग्रामीण /शहरी
• कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी) आवश्यकता नाही.
• कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी) आवश्यकता नाही.

📄 *आवश्यक कागदपत्रे* : 

▪️ विहित नमुन्यातील अर्ज 
▪️ पासपोर्ट फोटो 
▪️ उत्पन्नाचा दाखला
▪️ गतवर्षीची गुणपत्रिका 
▪️ जातीचा दाखला 
▪️ निवडणूक ओळखपत्र / आधार कार्ड / पाणी पट्टी / वीज बिल / रेशन कार्ड / विवाह नोंदणी प्रमाणपत्र / पारपत्र / राष्ट्रीयकृत बँक पासबुक 

💰 *लाभाचे स्वरूप असे* : स्वच्छतेच्या कामाकरिता उपयोगात येणारे वाहन व इतर साहित्य निर्मितीकरिता विशेष बाब म्हणून 10 लाखांपर्यंत कर्ज 8 टक्के व्याजदराने दिले जाते. प्रकल्पाच्या संपूर्ण रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ व 20 टक्के रक्कम महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत देण्यात येते.
कमाल कर्जमर्यादा 5 लाख.
• बँकेचा सहभाग व व्याजदर नाही. स्वतःचा सहभाग 5 टक्के, यंत्रणेचा सहभाग व व्याजदर 95 टक्के व व्याजदर 4 टक्के व 6 टक्के प्रमाणे (अनुदान 10 हजार रुपये /-) तारण यंत्रणेच्या नियमानुसार• इ. एम. आय. यंत्रणेच्या नियमानुसार• परतफेडीची सुरूवात 3 महिन्यानंतर किंवा व्यवसायानुसार परतफेडीचा कालावधी 60 महिने, शेरा राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळच्या कर्जाची परतफेड वेळेत न केल्यास 2 टक्के दंडव्याज आकारण्यात येते. उमेदवाराचा स्वतःचा सहभाग 1 लाख प्रकल्प मर्यादेपर्यंत निरंक व त्यापुढे 5 टक्के असतो.

🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* : 

▪️महात्मा फुले मागासवर्गविकास महामंडळ जिल्हा कार्यालय 

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Produk Lainnya