आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन
⚡️ गरिबीमुळे आदिवासी विद्यार्थी -विद्यार्थीनीचे शाळेत उपस्थित राहाण्याचे प्रमाण कमी आहे, ते नियमित शाळेत उपस्थित राहावेत याकरिता त्यांना मोफत गणवेश, पुस्तके, पाटया आदी साहित्य पुरविण्यात येत असले तरीही ते शाळेत येत नाहीत म्हणून त्या मुलांना शाळेत येण्याकरिता प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने त्यांना विद्यावेतन देण्याची योजना राबविली जाते.
🧐 *योजनेच्या प्रमुख अटी* : ज्या ठिकाणी मोफत राहण्याची व जेवणाची सोय असते अशा आश्रम व निवासी शाळेतील विद्यार्थी विद्यावेतनास पात्र नाहीत.
विद्यावेतन मिळण्यासाठी चांगली वर्तणूक व कमीत कमी 75 टक्के उपस्थिती अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
📄 *आवश्यक कागदपत्रे* :
● महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र
● आदिवासी प्रमाणपत्र
💸 *लाभाचे स्वरूप असे* : या योजनेद्वारे अनुसुचित जमातीच्या (इयत्ता 5 वी ते 10 वी) विद्यार्थ्यांना वर्षाला 500 रुपये सरासरी विद्यावेतन दिले जाते.)
🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* : शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व.
📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)