आम आदमी विमा योजना
गरामीण भागातील सर्व प्रवर्गातील नागरिकांना
विमासंरक्षण व शिष्यवृत्ती देण्यासाठी ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना सुरु
करण्यात आली आहे.
योजनेच्या प्रमुख अटी : ग्रामीण भागातील 18 ते 59
वयोगटातील भूमिहीन शेत मजूरांना तसेच 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकरपेक्षा
कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. वार्षिक
विम्याचा हप्ता 200 रुपयांचा असून केंद्र शासनामार्फत 100 रुपये व राज्य शासनामार्फत
100 रुपये विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे :
• जन्म
दाखला.
• शैक्षणिक
दाखला.
• शिधावाटप
कार्ड.
• वरील
प्रमाणपत्रे नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
आधार मानावे.
लाभाचे स्वरूप असे :
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या वारसास /
लाभार्थ्यास रक्कम दिली जाते.
• नैसर्गिक
मृत्यू - 30 हजार रुपये
• अपघाती
मृत्यू - 75 हजार रुपये
• अपघातामुळे
कायमचे अपंगत्व - 75 हजार रुपये
• अपघातात
दोन्ही डोळे किंवा दोन्ही पाय गमावल्यास - 75 हजार रुपये
• अपघातात
एक डोळा किंवा एक पाय गमावल्यास - 37 हजार 500 रुपये
या योजनेंतर्गत लाभार्थीच्या नववी ते बारावीत शिकणाऱ्या दोन मुलांना 100 रुपये प्रतिमहिना शिष्यवृत्ती दिली जाते.
या ठिकाणी संपर्क साधावा : तलाठी कार्यालय, तहसीलदार संजय गांधी योजना, जिल्हाधिकारी
कार्यालय.
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

