BLANTERTOKOSIDEv102
6217215329334371520

यांत्रिक अवजारांसाठी सरकारी योजना

यांत्रिक अवजारांसाठी सरकारी योजना


 राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. या अंतर्गत शेतकरी, उत्पादक संघ तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अवजारे, उपकरणे व संयंत्रे अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात.
योजनेच्या प्रमुख अटी :
लाभार्थींच्या नावे शेतजमीन असावी, त्यांच्या नावे 7/128-अ चा उतारा असणे आवश्‍यक आहे.
● 7/12 उताऱ्यावर फलोत्पादन पिकांची नोंद किंवा मंडळ कृषी अधिकारी यांचे फलोत्पादन पीक लागवडीचे प्रमाणपत्र असणे आवश्‍यक.
योजना राबविताना अनुसूचित जाती (16 टक्के), अनुसूचित जमाती (8 टक्के) आदिवासी महिला (30 टक्के) लहान शेतकरी आदीना प्राधान्याने नियमाप्रमाणे लाभ दिला जातो.
लाभार्थी- वैयक्तिक शेतकरी, नोंदणीकृत फलोत्पादन संघ, शेतकऱ्यांची नोंदणीकृत उत्पादक कंपनी.
फलोत्पादनाशी निगडित स्वयंसाहाय्यता गट, शेतकरी गट, महिला शेतकरी गट (किमान 10 सदस्य असावेत.)
देय अनुदान वगळता अवजारे/ उपकरणांच्या किमतीच्या उर्वरित 50 टक्के खर्च संबंधित लाभार्थी/ गटांनी स्वतः करावा.
सदरची अवजारे / उपकरणे चालू स्थितीत ठेवणे आणि त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासंदर्भात आवश्‍यक तो करारनामा संबंधित लाभार्थी/ गट/ संघ यांचेशी 100 रुपयांच्या स्टॅंप पेपरवर करून त्यांची हमी घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थ्यांचा विहित नमुन्यातील अर्ज
● 7/12, 8-अ उतारा- फलोत्पादन/ मसाला / भाजीपाला/ फूल पिके पिकाची नोंद असणे आवश्‍यक.
प्रस्तावित अवजारांचे दरपत्रक.
लाभार्थ्यांचे हमीपत्र.
सदर अवजारांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजनांमधून लाभ घेतला नसल्याबाबत लाभार्थ्यांचे हमीपत्र.
मार्गदर्शक सूचनेतील प्रपत्र-1 प्रमाणे जिअकृअयांच्या बरोबर केलेला करारनामा (100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर मूळ प्रतीत)

लाभाचे स्वरूप असे : या अंतर्गत शेतकरी, उत्पादक संघ तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अवजारे, उपकरणे व संयंत्रे अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात.
या ठिकाणी संपर्क साधावा :
मंडळ कृषी अधिकारी, पंचायत समिती कार्यालय
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)


Produk Lainnya