राज्यात 12 वीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
🧐 *योजनेसाठी प्रमुख अटी* :
▪️ इ. 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांमध्ये (कला ,वाणिज्य, विज्ञान) प्रथम वर्ष ते अंतिमवर्षात शिकत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना लागू आहे.
▪️ विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा व त्याने उच्च माध्यमीक शालांत परीक्षा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण केलेली असावी.
▪️ अर्जदार हा इतर कोणत्याही शिष्यवृत्ती/स्टायपेंडचा लाभार्थी नसावा.
▪️ पालकाचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
▪️ नतनिकरणासाठी विद्यार्थ्यांने पुढील वर्षात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
📄 *आवश्यक कागदपत्रे* :
● विद्यार्थ्याचा फोटो
● माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व त्यापुढील परीक्षांमधील गुणपत्रीकेच्या प्रती.
● पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
● महाविद्यालयास चालु वर्षाची फी भरल्याची पावती / रिसीप्ट.
● बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
● विद्यार्थ्याचे अल्पसंख्यांक असल्याबाबतचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
● महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
● आधार कार्ड छायांकित प्रत.
💰 *लाभाचे स्वरूप असे* : 5 हजार रुपयांपर्यंत. सदर रक्कम ही तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांचेतर्फे विद्यार्थ्यांचे बँक खात्यावर थेट (DBT) जमा करण्यात येते.
🏢 *या ठिकाणी संपर्क साधावा* : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)