BLANTERTOKOSIDEv102
6217215329334371520

संस्कृत शिक्षण शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

संस्कृत शिक्षण शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या


 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्याना संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्याना संस्कृत भाषेच्या गुणवत्ता शिष्यवृत्या केंद्र शासनाकडून दिल्या जातात. सदर योजना सर्व प्रवर्गासाठी आहे.

योजनेच्या प्रमुख अटी: इ. 8 वी मधील वार्षिक परीक्षेत संस्कृत या विषयामध्ये मिळालेल्या गुणवत्तेवर इ. 9 वी व 10 वी आणि 10 वीच्या गुणवत्तेवर इ. 11 वी व 12 वी मध्ये शिष्यवृत्ती दिली जाते.


  • आवश्यक कागदपत्रे : 


▪️ महाराष्ट्रात 15 वर्षे रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र.
▪️ इयत्ता 8 वी मधील वार्षिक परीक्षेमध्ये संस्कृत विषयात मिळालेल्या गुणवत्तेनुसार प्रमाणपत्र.


  • लाभाचे स्वरूप असे : मंजूर /मान्य संचानुसार इ .9 वी ते 12 वी (इ. 8 वी च्या वार्षिक परिक्षेमधील गुणांनुसार) प्रमाणित दराने.



  • या ठिकाणी संपर्क साधावा : विभागीय शिक्षण उपसंचालक (पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, औरगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर)


(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Produk Lainnya