
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
राज्याच्या ग्रामीण भाग हगणदारीमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबे तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शारीरीक अपंग, महिला, सीमांत, अल्प भूधारक शेतकरी, भूमिहीन परंतू स्वत:चे घर असलेले मजूर व महिला प्रमुख असलेल्या कुटुंबासाठी फ्लॅगशीप कार्यक्रम राबविला जातो.
- योजनेच्या प्रमुख अटी : यापूर्वी शौचालयाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच रकाना 5 मधील प्रवर्गातील असावा.
- आवश्यक कागदपत्रे: दारिद्र्यरेषेखालील कार्ड, संबधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र.
- लाभाचे स्वरूप असे : वैयक्तिक शौचालय बांधकाम व त्याचा नियमित वापर करण्यासाठी 12,000 रुपये /- प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.
- या ठिकाणी साधावा : संबधित ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, सातवा माळा, गोकूलदास तेजपाल रूग्णालय आवार संकुल इमारत, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई- 40001
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)